Join us

पोलादपुरात ७ दुकाने फोडली, एक लाखाचा ऐवज लंपास

By admin | Updated: July 20, 2014 23:01 IST

पोलादपूर शहरात महाबळेश्वर राज्यमार्गावर भर बाजारपेठेत शनिवार रोजी रात्री चोरट्यांनी ७ दुकाने फोडून सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली

पोलादपूर : पोलादपूर शहरात महाबळेश्वर राज्यमार्गावर भर बाजारपेठेत शनिवार रोजी रात्री चोरट्यांनी ७ दुकाने फोडून सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडलीपोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यालगत असणारी दुकाने सुनील रघुनाथ भिलारे यांचे स्वागत झेरॉक्स मधून १४ हजार रूपये रोकड, श्याम सिताराम कळंबे यांचे स्वामी समर्थ कलेक्शनमधून २७ पॅन्टी, सुभाष पालकर यांचे कल्पना ज्वेलर्स मधून दीड किलो चांदी २० ते २५ हजारांचा ऐवज, गणपत विठ्ठल निकम गणेश टेलर्स यांचे दुकानातून ५ड्रेस, दिपाली दिनेश निकम सचिता ब्युटी पार्लर यांचे कुलूप तोडले तर नंदाई मेडीकलचे कुलूप तोडले व १ हजार रूपये चोरीस गेले. किराणा मालाचे दुकानातून सुमारे १० हजार रूपयांची रोकड असे एकूण अंदाजे १ लाख रूपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेल्याचे रविवारी उघडकीस आले