Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोक्सोच्या आरोपातील आजोबाचा मृत्यू मधुमेहामुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालवणीत नातीला ‘पॉर्न’ व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप ६५ वर्षीय व्यक्तीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालवणीत नातीला ‘पॉर्न’ व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप ६५ वर्षीय व्यक्तीवर सुनेने केला होता. याप्रकरणी त्याला अटक करून त्यांची रवानगी बोरिवली कारागृहात केल्यानंतर त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तेव्हा त्यांना मधुमेह होता असे समोर आले.

वृद्धाविरोधात त्यांच्या सुनेने मंगळवारी मालवणी पोलिसात तक्रार केली होती. पती काही वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेल्याने ती सासऱ्यांसोबत दोन मुलींना घेऊन राहत हाेती. सासरा अश्लील व्हिडिओ पाहतो आणि तेच प्रकार नातीसोबतही करतो, अशी तक्रार तिने केल्यानंतर मालवणी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री वृद्धाला अटक केली. त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरने त्यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, तेव्हा त्याला मधुमेह होता असे समोर आले. त्यानुसार याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

...........................