कामोठे : मुंबईप्रमाणे आता लवकरच पनवेल परिसरातील रहिवाशांना पाइपलाइनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिलिंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नसून, त्या कटकटीतून पनवेलकरांची मुक्तता होणार आहे. येत्या काही दिवसांत खारघरमध्ये सुमारे नऊ हजार ग्राहकांना गॅसजोडणी करून देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वसाहतींमध्येही गॅसपुरवठा करण्याचे महानगर गॅस कंपनीचे उद्दिष्ट आहे. मुंबईपासून जवळ असलेले पनवेल परिसराची लोकसंख्या साडेआठ लाखांवर पोचली असून, लवकरच ती दोन आकडी होईल. उपनगरीय रेल्वे गाड्यांमुळे मुंबई अतिशय जवळ आली असून, मुंबईला पर्याय म्हणून पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलची महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू असून, या परिसरात तिसऱ्या मुंबईचा विकास होणार आहे. त्यामुळे पनवेल परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईला याचप्रकारे पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो. त्याच धर्तीवर सिडको वसाहती आणि पनवेल शहराला गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला खारघर वसाहतीपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. आता या वाहिन्या पनवेल शेडुंगपर्यंत विस्तारण्यात आल्या असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पनवेलकरांना प्रत्यक्ष जोडणी करून गॅसपुरवठा व्हावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लावून धरली आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीतील सीकेटी महाविद्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. महानगर गॅस कंपनीने लवकरात लवकर आपले काम पूर्ण करण्याबरोबरच नॅचरल गॅसबरोबर सीएनजीचीही पाइपलाइन आणण्याची मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली होती. त्यानुसार संबंधित कंपनीने सकारात्मक पावले उचलली असून, सर्वात अगोदर घरगुती ग्राहकांना जोडणी देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. खारघरमध्ये काम पूर्ण झाले आहे. पीएनजी ग्राहकांना मीटरद्वारे जोडणीच्मुंबईपासून बेलापूरपर्यंत आलेली मुख्य गॅसवाहिनी पुढे शेडुंगपर्यंत नेण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध परवानग्या, तांत्रिक अडचणी, स्थानिकांचा विरोध आदी विविध गोष्टींमुळे कामाला विलंब झाला आहे.च् हे काम पूर्ण झाल्यानंतर पनवेल परिसरातील प्रत्येक घरात जोडणी करण्यात येणार आहे. यासाठी सिलिंडर गॅसची नोंदणी रद्द केल्यानंतर महानगर गॅसची जोडणी मिळणार आहे. च्जोडणी शुल्क, सेवा शुल्क असे एकूण साडेसहा हजार रुपये भरून ग्राहकांना गॅसची जोडणी मिळणार आहे. पीएनजी ग्राहकांना मीटरद्वारे जोडणी करून एक स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर अवर अशी मोजदार करून माफक दराने गॅस उपलब्ध केला जाणार आहे. सिलिंडरपेक्षा सुरक्षितच्महानगर गॅस हा सिलिंडर गॅसपेक्षा सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोट किंवा अपघातासारख्या घटना घडत नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना सिलिंडर बंद केला की नाही, याची चिंता करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त महानगर गॅसदर माफक असल्याने ग्राहकांना परवडेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
नवीन वर्षात पनवेलकरांना पाइपने गॅस
By admin | Updated: December 20, 2014 22:12 IST