Join us

आमदार प्रशांत ठाकूरांच्या विरोधात शेकापची याचिका

By admin | Updated: December 8, 2014 22:35 IST

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई : पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ठाकूर यांनी निवडणूक आयोगाला अर्धवट माहिती सादर करत फसवणूक केल्याचा शेकापचा आरोप आहे.
शेकापचे पराभूत उमेदवार बाळाराम पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ठाकूर यांची आमदारकी  रद्द करण्याची मागणी केली आहे. ठाकूर यांनी उरण मधील मौजे जासई येथील सुमारे 11 लाख 5क् हजार किंमतीची जमीन मिळकत लपवून ठेवल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. शिवाय निवडणूक काळात हावरे स्लेडर सोसायटीच्या प्रवेशद्वारात पकडलेल्या संशयित गाडीत ठाकूर यांचे प्रचारसाहित्य सापडले होते. त्यात सुमारे अडीत लाख रुपयांची रोकड होती. ही रोकड बंद पाकिटात 5क्क् रुपयांच्या नोटा भरलेल्या स्वरूपात हस्तगत करण्यात आली होती. 
कॅगच्या अहवालात समोर आलेली संपत्ती संदर्भातील माहिती ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रत लपवून ठेवल्याचा आरोप माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ठाकूर यांचे सदस्यत्त्व रद्द करून फेरनिवडणुका घेण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. (प्रतिनिधी)