Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मशिदींवरील भोंग्याविरोधात याचिका

By admin | Updated: November 26, 2014 02:08 IST

पुण्यातील काही मशिदींवरील अवैध भोंग्यांविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल झाली आहे.

मुंबई : पुण्यातील काही मशिदींवरील अवैध भोंग्यांविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल झाली आहे. याची दखल घेत राज्य शासन व पुणो पोलीस आयुक्तांना न्यायालयाने नोटीस जारी केली आह़े याआधी नवी मुंबई येथील काही मशिदींवरील अवैध भोंग्यांप्रकरणी याचिका दाखल झाली आह़े आता पुणो व नवी मुंबईतून दाखल झालेल्या याचिकेवर चार आठवडय़ांनी एकत्रित सुनावणी होणार आह़े 
शैलेश दीक्षित यांनी अॅड़ वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत ही याचिका केली आह़े पुण्यात काही मशिदींवर लागलेले भोंगे रीतसर परवानगी घेऊन लावले नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आह़े तसेच एखाद्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावायचा असल्यास पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागत़े ही परवानगी घेण्यासाठी लागणारा अर्ज पोलीस संकेतस्थळावर उपलब्ध असून, लाऊडस्पीकर लावण्यासाठी 
वर्षाला 5क्क् रुपये शुल्कही आकारले जात़े
मात्र पुण्यातील काही मशिदींवर लागलेल्या भोंग्यांना पोलिसांनी परवानगी दिलेली नाही़ त्यामुळे याचे शुल्कदेखील भरले जात नाही़ तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा:याला 5 वर्षाची शिक्षा व 1 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो़ असे असताना पोलीस मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करीत नाहीत़ तेव्हा ही कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े या याचिकेवर न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ अजूजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने शासन व पुणो पोलीस आयुक्तांना नोटीस जारी करीत ही सुनावणी 4 आठवडय़ांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)