मुंबई : डेंग्यूचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्यामुळे प्लेटलेट्स (रक्तपेशींची) मागणी वाढली आह़े परंतु पालिकेच्या केईएम रुग्णालयात दक्षिण आशियातील पहिले प्लाङमा सेंटर गेली 11 वर्षे टाळे लागलेले आह़े यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना खाजगी कंपन्यांकडे जादा पैसे मोजावे लागत आहेत़ या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाब विचारल्यानंतर 15 दिवसांमध्ये सेंटर सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आह़े
रक्तापासून वेगळे केल्यानंतर प्लाङमातून वेगळे केलेल्या विविध घटकांचा उपयोग कर्करोगापासून मूत्रपिंडाच्या विकाराच्या उपचारासाठी करता येतो़ त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी पालिकेने 1989मध्ये केईएम रुग्णालयात प्लाङमा सेंटर सुरू केल़े मात्र क्षमतेपेक्षा जादा प्लाङमा साठवून ठेवण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने 2क्क्3मध्ये या सेंटरला टाळे लावल़े
मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असून, या आजारात रुग्णांच्या प्लेटलेट्स म्हणजेच रक्तपेशी झपाटय़ाने कमी होत जातात़ त्यामुळे रक्तपेशींची मागणी वाढली आह़े खाजगी सेंटर्सबरोबर अधिका:यांचे साटेलोटे असल्यानेच केईएमचे सेंटर अद्यापही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार यांनी केला़ या प्रकरणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्त सीताराम कुंटे यांची आज भेट घेतली़
त्यानुसार याबाबत बैठक बोलावून 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्यात येईल, अशी हमी प्रशासनाने दिल्याचे समजत़े (प्रतिनिधी)
शताब्दी रुग्णालयात मशीन धूळखात
केईएमचे प्लाङमा सेंटर बंद पडल्यानंतर 2क्क्6मध्ये गोवंडी शताब्दी रुग्णालयात प्लाङमा साठवून ठेवण्यासाठी नवीन मशीन आणण्यात आल़े मात्र या रुग्णालयातील मशीनही बंद पडल्यामुळे दुरुस्तीअभावी धूळखात पडले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष संजय पाटील यांनी केला़