Join us
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावण्याच्या वादातून कोयत्याने वार

By admin | Updated: July 3, 2017 12:09 IST

सरी येथील घटना : 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार ,दि.3 - अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा खालचापाडा येथे पडीक जागेत वृक्ष लागवडीच्या वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आला़ ही घटना शनिवारी दुपारी 12़30 वाजेच्या सुमारास घडली़ 
सरीचा खालचापाडा येथील केशव रामा वसावे हे सरी गावातील पडीक जमिनीवर झाडे लावण्यासाठी शनिवारी गेले होत़े या वेळी त्यांना शिवल्या मोत्या राऊत याने विरोध करत हातातील कोयत्याने डोक्यावर वार केला़ तसेच इतरांनी केशव वसावे यांना डेंगारा, कु:हाडी आणि दगडांच्या साहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली़ साधारण 16 ते 17 आरोपींना वसावे यांना बेदम मारहाण केली़ तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ या घटनेवेळी गावात वृक्ष लागवडीसाठी आलेले ग्रामस्थ घाबरले होत़े काहींनी मध्यस्थी करत वसावे यांना वाचवल़े याबाबत वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात शिवल्या मोत्या राऊत, वनसिंग खोजल्या राऊत, जि:या मोत्या राऊत, बांगीबाई जि:या राऊत, होमाबाई शिवल्या राऊत, ठोग्या शिवल्या राऊत, टेंब:या मांगा राऊत, बिला मोत्या राऊत, भांगडा पाल्या राऊत सर्व रा़ वालंबा यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े