Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोव्यात उन्मळून पडलेल्या झाडांच्या जागी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:08 IST

मुंबई : तोक्ते वादळामुळे वर्सोवा भागात जास्तीत जास्त झाडे पडली, त्याची दखल घेऊन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ...

मुंबई : तोक्ते वादळामुळे वर्सोवा भागात जास्तीत जास्त झाडे पडली, त्याची दखल घेऊन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान व बाजार समिती अध्यक्षा व प्रभाग क्रमांक ५९च्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी पुढाकार घेऊन जेवढी झाडे पडली आहेत, त्याच्या दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात यारी रोड येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख सतीश परब, उपशाखाप्रमुख राजेश रासम, तारिक पटेल, शंकर डांगळे, आश्विनी पाटील, धनु सिंग, मंजू आंग्रे, युवा सेनेचे संदीप पडवळ, स्वप्नील शिवेकर, प्रियांका म्हात्रे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

उन्मळून पडलेल्या झाडांच्या जागी पिंपळ, सदाफुली अशा प्रकारची दहा झाडे लावून वृक्षाराेपणास सुरुवात केली. वर्सोव्यात महिन्याभरात २५० झाडे लावण्याचा संकल्प सोडल्याची माहिती प्रतिमा खोपडे यांनी दिली.

................