Join us  

विसर्जनासाठी ‘एक नगरसेवक एक कृत्रिम तलावा’चे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:42 AM

मुंबईच्या पश्चिम उपनगरात काही ठिकाणी एक प्रभाग, एक गणपती अशी कल्पना राबविली जाणार आहे

मुंबई : मुंबापुरीतल्या गणेशोत्सवाचे पडघम आता वेगाने वाजू लागले आहेत. सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याने मुंबईला उत्सवाचा साज चढला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव भान राखून साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान अधिकाधिक गणेशमूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी वॉर्ड स्तरावर काम हाती घेतले आहे. प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात एका कृत्रिम तलावाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. २४ वॉर्डनिहाय आणि २२७ प्रभागनिहाय नगरसेवकांचा जरी विचार केला तरी मुंबई महापालिकेने आपले लक्ष्य पूर्ण केल्यास मुंबईत सरासरी २००हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात काही ठिकाणी एक प्रभाग, एक गणपती अशी कल्पना राबविली जाणार आहे. मुंबई महापालिकेनेच यात पुढाकार घेतला आहे. पश्चिम उपनगराप्रमाणे पूर्व उपनगरात आणि शहरात ही कल्पना राबविता येईल का? याचाही काही मंडळी विचार करत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास आपण नक्कीच कोरोनाचा संसर्ग थांबवू शकू. शिवाय कोरोनावर विजय प्राप्त करू शकू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आता गणेशोत्सव अधिकाधिक आरोग्योत्सव कसा होईल, यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भर दिला जात आहे. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यासाठी कामही सुरू केले असून, उर्वरित मंडळेही त्यांचा कित्ता गिरवतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने घरगुती आणि सार्वजनिक श्रीगणेशोत्सव-२०२० संदर्भात सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोविड-१९ या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा श्रीगणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन महानगरपालिका व शासनस्तरावरून वेळोवेळी नागरिकांना करण्यात आले आहे. काही अधिकच्या सूचनांचा समावेश करून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी काही सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.हे कराच...च्सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारावेत.च्घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.च्आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.च्ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे..च्विविध गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.च्कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याबाबत मागणी आल्यास, काही जुजबी पडताळणी करून त्यास त्वरित मान्यता द्यावी.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव विधी