मुंबई : शहरातील यापूर्वी घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील अतिरेकी तसेच परराज्यातून शहरात आश्रय घेण्यासाठी आलेले गुन्हेगार, अंमली पदार्थांची तस्करी करणारे, गुन्हेगारी क्षेत्रात अवैध व्यवसाय करणारे गैरकृत्य करण्यासाठी भाडेतत्त्वावर राहत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यावर वचक बसविण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाडेकरू ठेवण्यापूर्वी घरमालकांनी पोलिसांना भाडेकरूंची सर्व माहिती कळविण्याचे सक्त आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहे. शहराकडे नोकरी आणि कामानिमित्त शेकडो नागरिकांचा लोंढा रोज मुंबईत दाखल होत असतो. मात्र घर नसल्याने हे भाड्याच्या घराचा आश्रय घेतात. या भाडेकरुंची माहिती देण्याची तसदी घरमालक अनेकदा घेत नाहीत. त्यांची माहिती पोलिसांना देखील नसते. त्यातच एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधणे, पोलिसांना अवघड होऊन बसते. त्यामुळे भाडेकरूंची माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे. यासाठीच पोलिसांनी आता ठोस पावले उचलणे सुरु केले आहे. भादवि कलम १४४ अंतर्गत पोलिसांनी घर मालकांना हे सक्त आदेश देत भाडेकरूंची माहिती कळवणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिधी)
भाडेकरू ठेवण्यापूर्वी साधा पोलिसांशी संपर्क
By admin | Updated: May 12, 2015 04:36 IST