Join us

पालिकेत नमाज पठणासाठी हवी जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 03:46 IST

महापालिका मुख्यालयात नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई  - महापालिका मुख्यालयात नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत सत्ताधारी सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पालिका शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करण्याऱ्या ठरावाची सूचना गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात महासभेत मंजूर करण्यात आली होती. मात्र रईस शेख यांनी आता नवीन मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे. सर्व पक्षांतील मुस्लीम नगरसेवकांना पक्ष कार्यालयात किंवा मिळेल त्या जागेत नमाज पठण करावे लागते. त्यामुळे सर्वधर्मीय सदस्य, कर्मचारी, अधिकारी यांच्याकरिता महापालिका मुख्यालयात एक जागा आरक्षित करून तेथे प्रार्थनास्थळ उभारण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाबातम्या