मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे आयोजित पु.ल युवा महोत्सवाची सांगता बुधवारी पुलंच्या सदाबहार ‘वा:यावरची वरात’ या श्रीकांत मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाने झाली. गेले पाच दिवस नाट्य, नृत्य, कलात्मक क्रीडाप्रकार आणि संगीत क्षेत्रतले समकालीन उत्तमोत्तम कार्यक्रमांची आणि कार्यशाळांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामुळे ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’चे प्रांगण प्रेक्षकांनी फुलून गेले होते.
या नाटकात आनंद इंगळे, अतिशा नाईक, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, अमोल बावडेकर, सुप्रिया पाठारे, समीर चौघुले, अपर्णा अपराजित, विघ्नेश जोशी, श्रद्धा केतकर, रमेश वाणी, सुहास चितळे, अमित जांभेकर, प्रणव रावराणो आणि श्रीकांत मोघे असा नटसंच होता. महोत्सवाच्या अखेरच्या सकाळी ‘स्त्री विविधा’ हा प्राचीन काळापासून आतापयर्ंत स्त्री जीवनात झालेल्या बदलांचा वेध घेणारा कार्यक्रम स्मिता आपटे यांनी सादर केला. त्यानंतर सोशल मिडीयावर विशेष चर्चेत असलेल्या ‘व्ही चार’ या युवा गीतकार अश्विनी शेंडे, मंदार चोळकर, तेजस रानडे आणि समीर सावंत यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारपासून अभिनय, रंगभूषा, आवाज जोपासना, वक्तृत्व, सूत्रसंचालन, एकाभिनय, शाहिरी, चित्रकला, अर्कचित्र-व्यंगचित्र रेखाटन, अक्षरलेखन, कलारीपायटू, कथ्थक, ओडिसी, भरतनाट्यम आणि डिजिटल छायाचित्रण विषयक मान्यवर प्रशिक्षकांच्या चार दिवसीय कार्यशाळा सुरु झाल्या. या सर्व कार्यशाळांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला.भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ असलेल्या रॉकबँडने महोत्सवाचा तिसरा दिवस गाजवला. विशेष म्हणजे मराठी संगीत क्षेत्रत रॉक संगीताची ङिांग आणि जादू लोकांपयर्ंत पोहोचवण्याचे काम नंदू भेंडे यांनी केले. विसुभाऊ बापट यांचे ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा निवडक कवितांचा कार्यक्रम दर्दी प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल उपस्थित रंगला. देश-परदेशात शास्त्रीय नृत्यपरंपरेचा प्रसार करणारे नामवंत कलावंत अमृता पांचाळ, उमा डोगरा, सुमित नागदेव आणि वैभव आरेकर यांनी भरतनाट्यम, कथ्थक तसेच समकालीन नृत्याविष्कार सादर केले. राज्यभरातले प्रख्यात शाहीर मधु खामकर, शांताराम चव्हाण, भिकाजी भोसले, दत्ता ठुले, कृष्णकांत जाधव, निलेश जाधव आणि दादा मांजरेकर यांच्या पहाडी आवाजात शाहिरी जलसा रंगला. पुलंच्या ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटाला नव्या-जुन्या पिढीतल्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कांचन सोनटक्के यांच्या ‘नाट्यशाळा’ संस्थेच्या कर्णबधीर मुलांनी सादर केलेल्या आणि विशेष गौरवल्या गेलेल्या मानवी उत्क्रांतीवर आधारित ‘भरारी’ या नाटकातला देखणा आविष्कार प्रेक्षकांना नि:शब्द करून गेला. (प्रतिनिधी)
प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
4दर्जेदार कार्यक्रमांचा पुल युवामहोत्सव प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादाने यशस्वी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेत आता या महोत्सवाने मानाचे स्थान मिळवले आहे.
4पाच दिवस नाट्य, नृत्य, कलात्मक क्रीडाप्रकार आणि संगीत क्षेत्रतले समकालीन उत्तमोत्तम कार्यक्रमांची आणि कार्यशाळांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामुळे ‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’चे प्रांगण प्रेक्षकांनी फुलून गेले होते.