Join us

पु.ल. देशपांडे अकादमीचा भाव वधारला!

By admin | Updated: March 4, 2015 01:18 IST

विजेच्या दरात वेळोवेळी होणारी वाढ, दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणांमुळे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर आणि मिनी थिएटरचा भाव आता वधारला आहे.

मुंबई : विजेच्या दरात वेळोवेळी होणारी वाढ, दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणांमुळे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर आणि मिनी थिएटरचा भाव आता वधारला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आयोजकांना तीन ते चार हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. पु. ल़ देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा, वातानुकूलित यंत्रणेमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा वाढीव खर्च विचारात घेऊन अकादमी संकुलातील रवींद्र नाट्यमंदिर, मिनी थिएटर, कला दालने, कलांगण, प्रदर्शन कक्ष, तालीम दालन यांच्या भाडेदरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी शासनाने नुकताच अध्यादेशही काढला आहे.या भाडेवाढीचा जास्त फटका अमराठी कलाविष्कारांना बसणार असून, त्या तुलनेत मराठी कलाविष्कारांना कमी भाडे मोजावे लागणार आहे. मात्र कोणत्याही शासकीय विभागाला, उपक्रमाला, परदेशी दूतावासाला, केंद्र शासनाला व त्यांच्या उपक्रमाला भाडेदरात कोणतीही सवलत मिळणार नसल्याचेही भाडेवाढीच्या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.केवळ बालनाट्यासाठी मराठी आणि अमराठी भाड्याच्या दरात २५ टक्के सवलत मिळणार आहे. मात्र ही सवलत रवींद्र नाट्यमंदिर आणि मिनी थिएटर या दोन्ही सभागृहांच्या सकाळच्या सत्रासाठी लागू राहील. (प्रतिनिधी)च्अकादमीच्या सहकार्याने होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रत्येक वर्षी रवींद्र नाट्यमंदिराची १२ सत्रे व मिनी थिएटरची १२ सत्रे विनामूल्य वापरता येतील. ही विनामूल्य सत्रे कोणत्या कार्यक्रमासाठी वापरावीत, याबाबत प्रकल्प संचालक निर्णय घेतील. च् सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या कार्यक्रमांसाठी दरवर्षी नाट्यमंदिराची १२ सत्रे व मिनी थिएटरची ६ सत्रे राखून ठेवण्यात येईल.च् भाडेवाढीचा जास्त फटका अमराठी कलाविष्कारांना बसणार असून, त्या तुलनेत मराठी कलाविष्कारांना कमी भाडे लागेल.