मुंबई : शहर व पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतरही पूर्व उपनगरातील रस्ते मात्र खड्डय़ातच होत़े अखेर निवडणुकीनंतर पूर्व उपनगरच्या रस्त्यांची दुर्दशा संपली असून रस्त्यांच्या कडेला फरसबंदीच्या कामांनाही लवकरच सुरुवात होणार आह़े तब्बल 2क्8 कोटी रुपयांचा हा प्रकल्प स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आह़े त्यामुळे अखेर पूर्व उपनगरातील रस्त्यांना चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधीच पूर्व उपनगरातील मोठय़ा व छोटय़ा रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा करण्यात आला होता़ त्यानुसार चेंबूर, कुर्ला, भांडुप, मुलुंड येथील रस्त्यांची तब्बल 22क् कोटींची कामे पालिकेने हाती घेतली़ त्यानंतर पालिकेने आता भांडुप, विक्रोळी, मुलुंड, मानखुर्द आणि गोवंडीतील रस्त्यांच्या कडेला फरसबंदीचा प्रस्ताव आणला आह़े
पूर्व उपनगरातील रस्त्यांची विविध कारणांमुळे दुर्दशा झाली आह़े मात्र दुरुस्तीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी मंजूर होऊनही निवडणुकीच्या काळात या कामाला सुरुवात झाली नाही़ या विलंबामुळे पूर्व उपनगरातील रहिवाशांचे मात्र हाल होत होत़े अखेर निवडणुकीच्या कामातून मुक्त झाल्यानंतर पालिकेने पूर्व उपनगरातील रस्त्यांची डागडुजी व फरसबंदीला सुरुवात केली
आह़े (प्रतिनिधी)
यामुळेच
रस्त्यांची दुरवस्था
वाहतुकीचा भार, विविध उपयोगिता सेवांमार्फत सुरू असलेले रस्त्यांचे खोदकाम, पाणी तुंबणो, जलवाहिन्यांच्या गळतीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आह़े वाहतुकीचा भार, विविध उपयोगिता सेवांमार्फत सुरू असलेले रस्त्यांचे खोदकाम, पाणी तुंबणो, जलवाहिन्यांच्या गळतीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत आह़े
अशी आहेत रस्त्यांची कामे
1भांडुपमधील 22 रस्ते, मुलुंडमधील 18 रस्त्यांच्या फरसबंदीसाठी 147 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ तर चेंबूरमधील 15 रस्त्यांच्या कडेला फरसबंदीसाठी 61 कोटी 65 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत़
2बारा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणो अपेक्षित आह़े तसेच रस्त्यांचा हमी कालावधी तीन वर्षाचा असणार आह़े या काळात रस्त्यांची देखभाल व डागडुजीची जबाबदारी ठेकेदारांची असणार आह़े
3शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कडेलाही फरसबंदीचे काम केले जाणार आह़े यामध्ये मौलाना डी विभागात शौकत अली रोड, भुलेश्वर मार्ग आणि सी विभागात महर्षी कव्रे मार्गाचा समावेश आह़े यासाठी सात कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत़