Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यातील फुगारेवाडीत हाणामारी

By admin | Updated: April 23, 2015 22:43 IST

: तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायतीतील फुगारेवाडी गावात मंगळवारी रात्रौ उशिरा दोन गटांत झालेल्या हाणामारीत अनेकांची डोकी फुटल्याची घटना घडली.

रोहा : तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायतीतील फुगारेवाडी गावात मंगळवारी रात्रौ उशिरा दोन गटांत झालेल्या हाणामारीत अनेकांची डोकी फुटल्याची घटना घडली. या गंभीर प्रकरणात राष्ट्रवादीचे उपसरपंच सुनील रघुनाथ शिंदे व इतरांना अटक करण्यात आली आहे. हाणामारी प्रकरणाबाबत रोहा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.चार महिन्यांपूर्वी फुगारेवाडीमधील दोन गटांमधील व्यक्तीची दारू पिण्यावरुन ठाणे कळवा येथे भांडणे झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपींनी मंगळवार रात्रौ काही समर्थकांना जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना काठी, लोखंडी शिगा आणि धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले. त्या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याचे रोहा पोलिसांनी सांगितले. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून सुनील रघुनाथ शिंदे, किशोर रघुनाथ शिंदे, स्वप्नील सुनील शिंदे, सौरभ सुनील शिंदे, अशोक विठ्ठल कोकाटे, सुमन अशोक कोकाटे, अनिता कोकाटे, पंकेश दत्ताराम शिंदे, संकेत गोपाळ शिंदे, गोपाळ श्रीपत शिंदे, दत्ताराम श्रीपत शिंदे, सविता गोपाळ शिंदे यांची नावे आहेत. आरोपींना रोहा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.