Join us

वहिनीने जीन्स घातली म्हणून दिराने केले फोटो व्हायरल

By admin | Updated: July 17, 2016 10:14 IST

घरातली मोठी सून असतानाही जीन्स घालते, म्हणून आध्यात्मिक विचारसरणीच्या दिराने तिच्या फोटोखाली अश्लील शेरेबाजी करत ते फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये

- मनीषा म्हात्रे, मुंबईघरातली मोठी सून असतानाही जीन्स घालते, म्हणून आध्यात्मिक विचारसरणीच्या दिराने तिच्या फोटोखाली अश्लील शेरेबाजी करत ते फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी केरळहून २३ वर्षीय दीर उन्नीकृष्णनला अटक केली आहे. शनिवारी न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.मूळची केरळची रहिवासी असलेल्या नेहाचा (नावात बदल) नोव्हेंबर २०१४ मध्ये विवाह झाला. उच्चशिक्षित, तसेच आधुनिक विचारसरणीमुळे नेहाने लग्नानंतर काही महिन्यांतच जीन्स घालण्यास सुरुवात केली. अशातच पतीला आखाती देशांमध्ये नोकरी लागली. त्यामुळे कामानिमित्त तो तिकडे रवाना झाला, तर नेहाला एमबीएचे शिक्षण पूर्ण करायचे असल्याने ती माहेरी आली. भांडुप परिसरात ती तिच्या आईसोबत राहते. सोशल मीडियावर मित्र-मंडळींशी गप्पा मारत असताना, मित्रांकडून मिळालेल्या माहितीने नेहाला धक्काच बसला. ही बाब समजताच फोटोची खातरजमा करून थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र, फोटो व्हायरल करणारे अकाउंटच फेक असल्याचे समोर आले. हा तपास सुरू असताना पोलीस उन्नीकृष्णनपर्यंत पोहोचले. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीने पोलीसही गोंधळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नीकृष्णन हा नेहाचा चुलत दीर लागतो. आध्यात्मिक विचारसरणीच्या असलेल्या उन्नीने दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पूजापाठाकडे भर दिला. भावाच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच नेहाचे आधुनिक वागणे त्याच्या डोळ्यांत खुपसायला लागला. घरातली मोठी सून असतानाही पूजापाठ न करता तिला जीन्स घालून फिरायला आवडते, हे त्याला आवडत नसे. त्यामुळे तो नेहाचा रागराग करे. वहिनी जीन्स घालते, म्हणून तिचे चारित्र्यही खराब आहे, अशी मानसिकता त्याची निर्माण झाली. त्यात त्याने फेसबुकवर नुकतेच अकाउंट तयार केले असताना, नेहाचा जीन्सवरचा फोटो त्याच्या नजरेत पडला. त्याच रागात आणखीन भर पडली. आपल्या वहिनीच्या अशा फोटोंचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो. याची जाणीव करून देण्यासाठी त्याने वहिनीच्या फोटोखाली मल्याळम भाषेत अश्लील शेरेबाजी केली. - नेहाच्या फोटोखाली अश्लील शेरेबाजी करत ‘बार गर्ल’ म्हणून तिचे फोटो शेअर झाले होते. ही बाब समजताच फोटोची खातरजमा करून थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. ३१ मे रोजी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी शोध सुरू केला. मात्र, फोटो व्हायरल करणारे अकाउंटच फेक असल्याचे समोर आले.