Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेकापचे आस्वाद पाटील विजयी

By admin | Updated: January 30, 2015 22:28 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या शहापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेकापचे आस्वाद पाटील हे १२ हजार ४३५ मतांनी विजयी झाले.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शहापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेकापचे आस्वाद पाटील हे १२ हजार ४३५ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचा धुव्वा उडविला. त्यांच्या विजयाने शेकापच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष साजरा केला. शेकापचे विद्यमान आमदार सुभाष पाटील यांच्या रिक्त झालेल्या शहापूर मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ जानेवारी रोजी पार पडली होती. आज जेएसएम कॉलेजच्या परिसरात मतमोजणी प्रक्रियेला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर हे निवडणूक अधिकारी होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शेकापच्या आस्वाद पाटील यांनी लीड घेतली होती. ती चौथ्या फेरीपर्यंत राहिली. पाटील यांना काँग्रेसच्या प्रदीप पाटील यांच्यापेक्षा आठ हजार २७३ मते अधिक मिळाली. आस्वाद पाटील यांना १२ हजार चारशे ३५ मते मिळाली तर काँग्रेसचे प्रदीप पाटील यांना ४ हजार १६२ मते मिळाली. (वार्ताहर)