Join us

फिल्मसिटीत कॅमेरामनच्या पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:13 IST

फिल्मसिटीमध्ये कॅमेरामन मनोज गोयल याची पत्नी नीलिमा गोयल ( वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबई, दि. 30 - फिल्मसिटीमध्ये कॅमेरामन मनोज गोयल याची पत्नी नीलिमा गोयल ( वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या या कृत्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मनोज गोयल पत्नीसमवेत कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील अलिकानगरच्या 204 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतात. शनिवारी घरी कोणी नसताना नीलिमा यांनी बेडरुममधील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. घरातील मंडळी परतल्यानंतर रात्री हा प्रकार उघडकीस आला. याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.