ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्व पेट्रोलपंप पाच तासांसाठी बंद राहणार आहेत. मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद असतील. पेट्रोल पंप असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत 11 नोव्हेबरच्या मध्यरात्री संपणार आहे. त्यामुळे ग्राहकांसोबत वादावादी होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 12 नोव्हेबरला सकाळपासून पेट्रोलपंप नेहमीप्रमाणे सुरू राहतील आणि केवळ नव्या नोटाच स्वीकारल्या जातील.