मुंबई : पीटर मुखर्जीशी झालेले संभाषण राहुलने रेकॉर्ड केले होते व त्यातून हे दिसते की शीनाचा खून झाल्यानंतर तो (पीटर) तिच्या संपर्कात आहे, असे अनिल सिंह म्हणाले. पीटर मुखर्जीला १४ दिवसांच्या कोठडीची मागणी त्यांनी केली. कुटुंबातील सदस्य अचानक बेपत्ता झाल्यानंतही पीटरने काहीच का प्रयत्न केले नाहीत आणि तिच्याबद्दल त्याने चुकीच्या गोष्टी का सांगितल्या असा युक्तिवाद अनिल सिंह यांनी केला. त्यांचे आर्थिक व्यवहार मुंबई-दिल्ली-गुवाहाटी-शिलाँग आणि विदेशातही पसरले आहेत आणि खूनाचा हेतू स्पष्ट होण्यासाठी त्यांचा शोध घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पीटर मुखर्जीचे वकील निरंजन मुंदरगी म्हणाले की,‘‘पीटर राहुलशी खोटे बोलला हे मान्य केले तरी त्याने ते राहुल आणि इंद्राणीतील तणाव कमी करण्यासाठी केले. शीना पीटरची कोणीही लागत नसताना तिचा खून करण्यात त्याचा काय लाभ होता? कोणताही पती पत्नीशी अनेकवेळा बोलणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा अर्थ त्याचा कोणत्याही प्रकारे त्यात सहभाग आहे, असे सूचित होत नाही. पीटर स्वत: एकदिवस आड चौकशीसाठी उपस्थित राहिला आहे आणि त्याने मुंबई पोलिसांना सहकार्य केले आहे, असेही मुंदरगी म्हणाले. दोन्ही बाजुंचे युक्तिवाद ऐकून दंडाधिकारी आर. व्ही. अदोने यांनी मुखर्जीला २३ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली.सीबीआयच्या वरिष्ठ अधिकारी म्हणाला की,‘‘शीनाच्या खूनामागे त्या दोघांचे अनेक हेतू होते आणि त्यातील महत्वाचा हेतू म्हणजे इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांचा राहुल व शीना यांच्या विवाहाला विरोध असल्यामुळे ‘आॅनर किलिंग’ एक होता. इंद्राणीने शीनाला दिल्लीत फ्लॅट भेट दिला होता व त्याचे ‘गिफ्ट अॅग्रिमेंट’ही केले होते. परंतु जेव्हा तिला शीना आणि राहुलचे प्रेम प्रकरण समजले त्यावेळी तिने ते अॅग्रिमेंट रद्द करून तो फ्लॅट विकून टाकला. यानंतर शीनाने इंद्राणीला ब्लॅकमेल करायला सुरवात केली.मला जर मुंबईत फ्लॅट दिला नाही तर मी पीटरला इंद्राणी ही माझी बहीण नसून आई आहे, असे सांगेन, असे शीना तिला धमकावू लागली, असे हा अधिकारी म्हणाला. इंद्राणी आणि संजीव खन्ना यांनाही आपली मुलगी विधी हिचा वाटा शीना मागेल अशी काळजी वाटत होती. हादेखील खुनामागचा हेतू असू शकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. आता पीटर आमच्या ताब्यात असल्यामुळे खूनाचा नेमका हेतू आम्ही शोधून काढू, असे त्याने म्हटले. पीटर हा पूर्णपणे इंद्राणीच्या प्रभावाखाली होता आणि ती जे काही सांगेल ते तो करीत होता, असेही हा अधिकारी म्हणाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ७-८ अधिकाऱ्यांची तुकडी सध्या मुंबईत मुक्कामाला आहे.माझ्या वडिलांना अटक झाल्याचा मला धक्का बसला. कटाबद्दल त्यांना काही माहिती असेल, असे मला वाटत नाही. अन्यथा मी आज न्यायालयात आलो नसतो, असे राहुल मुखर्जी म्हणाला.ईडीला पत्र लिहूसीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही या प्रकरणातील आर्थिक बाजूची तपासणी करीत आहोत. परंतु नंतर पीटर व इंद्राणी मुखर्जींनी विदेशातील कंपन्यांत हवालासारखे व्यवहार केल्याचे तपासात आढळल्यास सक्त वसुली संचालनालयाला (ईडी) तपास करा, असे पत्र लिहू.रॉबिनची गळाभेट : पीटरचा भाऊ गौतम आणि त्याची पत्नी पीटरची मुले राहुल आणि रॉबिन यांच्यासह न्यायालयात होते. फिकट निळ््या रंगाचा शर्ट पीटरच्या अंगात होता. त्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसला. सीबीआयने त्याच्या कोठडीची मागणी केल्यावर दोन्ही बाजुंनी होणाऱ्या युक्तिवादाकडे त्याचे लक्ष होते. पोलिसांनी नंतर त्याला संरक्षणात मागे घेतले त्या वेळी त्याने धाकटा मुलगा रॉबिनची गळाभेट घेतली.आहार शाकाहारीपीटर सीबीआय अधिकाऱ्यांना सहकार्य करीत असून त्याचा आहार शाकाहारी आहे. न्यायालयात हजर करताना मला दाढी करायची असल्याची त्याने विनंती केली होती. ती मान्य केली.
पीटरची भूमिका संशयास्पद
By admin | Updated: November 21, 2015 02:56 IST