मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला. केस डायरीत नमूद करण्यात आलेल्या बाबी लक्षात घेत विशेष महिला न्यायालयाच्या न्या. एच. एस. महाजन यांनी जामीन अर्ज फेटाळला.‘शीनाचा मृतदेह पुरण्यापूर्वी इंद्राणी आणि पीटरमध्ये मोबाईलद्वारे १५ मिनिटे संभाषण झाले. पीटरचे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. त्याने शीनाला शोधण्यासाठी राहुलला मदत का केली नाही. त्याने पोलिसांना सहकार्य करण्यास का सांगितले नाही?’ असा प्रश्न सीबीआयच्या वकिलांनी केला. इंद्राणी तिचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांना आॅगस्टमध्ये अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज नामंजूर
By admin | Updated: May 24, 2016 03:18 IST