Join us  

कांदिवलीच्या महावीर नगरात टर्फ स्पोर्टसला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 5:47 PM

Permission for Turf Sports : उत्तर मुंबईसह मुंबईला मिळणार टर्फ स्पोर्टसची सुविधा 

मुंबई :  मुंबई महानगर असो वा जगातील अन्य कुठल्याही महानगरात लोकसंख्या  वाढत असते  त्या ठिकाणी पर्यावरण, मैदाने, खेळ, क्रीडा,उद्यान असे विषय नागरिकांसाठी महत्वाचे असतात. 

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन टर्फ स्पोर्ट्सची सुविधा उत्तर मुंबईसह मुंबईत देखिल उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाला मान्यता मिळविण्यात यश मिळाले असून क्रीडा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

 2016 मध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या संचालकांना मैदानात जाळे टाकून क्रिकेट किंवा कोणताही खेळ खेळण्यास पालिका  प्रशासन आडकाठी करू लागले. त्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांनी थेट मनपा आयुक्त, उच्च अधिका-यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पालिका प्रशासनाने अखेर येथे टर्फ स्पोर्टसला परवानगी दिली.

 एकदा तक्रारदाराने पुन्हा कांदिवली पश्चिम महावीर नगरातील मोकळ्या मैदानात टर्फ स्पोर्ट्स विरोधात मनपा प्रशासनाकडे तक्रार दिली. ज्या विषयला एकदा प्रशासनाच्या उच्च अधिका-यांनी मान्यता दिली असतांना तक्रारदाराची तक्रार लक्षात घेऊन  पालिका प्रशासनाने टर्फ स्पोर्ट्स विरोधात कारवाई करावी, ही दुर्दैवी घटना असल्याचे मत खासदार  शेट्टी यांनी व्यक्त केले.

 गेल्या दि,7 मे व पुन्हा दि,20 मे रोजी  मनपा उपायुक्तांना लिहिलेल्या पत्रात खासदार  शेट्टी यांनी  नगर विकास मंत्रालय आणि मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. अखेर गेल्या दि,24 जुलै रोजी पत्राद्वारे मनपा आयुक्तांनी कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखाना, महावीर नगर या मैदानाशी संबंधित टर्फ स्पोर्ट्ससाठी त्यांना परवानगी दिली. त्यामुळेच आता हेच नियम फक्त उत्तर मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबईतही जिथे मैदान टर्फ स्पोर्ट्ससाठी न्यायोचीत ठरणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई