Join us

पोलिसांच्या परवानगीनेच निघणार विजयी मिरवणुका

By admin | Updated: October 19, 2014 00:56 IST

मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीचे भवितव्य पूर्णपणो स्थानिक पोलीस ठाण्यांवर अवलंबून असेल.

मुंबई : मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीचे भवितव्य पूर्णपणो स्थानिक पोलीस ठाण्यांवर अवलंबून असेल. स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली तर मिरवणुका काढता येणार नाहीत. परवानगीशिवाय मिरवणूक काढलीच तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील.
उद्या दुपारी 12र्पयत मुंबईतल्या बहुतांश मतदारसंघांतील मतमोजणी पूर्ण झालेली असेल किंवा तोर्पयत कोण विजयी होणार हे स्पष्ट तरी झालेले असेल. त्यातच रविवार असल्याने विजयी उमेदवाराचे स्वागत, जल्लोष करण्यासाठी मोठी गर्दी मतमोजणी केंद्रे, उमेदवारांचे निवासस्थान किंवा कार्यालयांबाहेर मोठी गर्दी उसळू शकते. मात्र उमेदवारांना मिरवणूक काढण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी गरजेची असेल. राजकीय, धार्मिक संवेदनशीलता, उपलब्ध मनुष्यबळ ही परिस्थिती लक्षात घेऊन त्या त्या पोलीस ठाण्यांतील अधिकारी मिरवणुकीच्या परवानगीबाबत निर्णय घेतील.
मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात जमावबंदी जारी आहे. मात्र विजयी उमेदवाराला निकालानंतर लगेचच मिरवणूक काढता येईल. फक्त त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी आवश्यक राहील. पोलिसांनी मान्य केलेली वेळ आणि मार्ग ही बंधने कार्यकत्र्याना काटेकोरपणो पाळावी लागतील. मतदारसंघ राजकीय, धार्मिक दृष्टिकोनातून संवेदनशील असल्यास, मिरवणूक काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास स्थानिक पोलिसांना परवानगी नाकारण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. याशिवाय मतमोजणीसाठी मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचा:यांना बंदोबस्ताच्या कामात जुंपण्यात आले आहे. मतदानानंतर मतमोजणी शांततेत, पारदर्शकपणो पार पडावी यासाठी पोलीस 24 तास डोळ्यांत तेल घालून आहेत. (प्रतिनिधी)