Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकांपर्यंत विज्ञानाचा खरा इतिहास पोहोचला पाहिजे

By admin | Updated: June 20, 2017 05:35 IST

आपल्याकडे भरपूर क्षमता असली, तरीही आपल्या संशोधनामध्ये काही त्रुटी आहेत. आपली विज्ञान क्षेत्रातील कामगिरी पाहिजे तशी झालेली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्याकडे भरपूर क्षमता असली, तरीही आपल्या संशोधनामध्ये काही त्रुटी आहेत. आपली विज्ञान क्षेत्रातील कामगिरी पाहिजे तशी झालेली नाही. आपण प्राचीन भारताच्या इतिहासामधील कुठलेही तर्क लावून आपल्या मनाचे समाधान करून घेतो. जुन्या काळातील कथांमधून वैज्ञानिक तर्कांच्या मिश्रणाकडे लक्ष देता कामा नये. परिणामी, शास्त्रज्ञांनी काय कामे केली, हे लोकांना समजले पाहिजे आणि ते समजून दिले पाहिजे. हे करतानाच लोकांपर्यंत विज्ञानाचा खरा इतिहास पोहोचला पाहिजे, असे मत इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुधीर पानसे यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेंतर्गत, ‘आधुनिक भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती’ या विषयावर सुधीर पानसे बोलत होते. दरम्यान, प्राचीन काळातील विज्ञान हे भारताबरोबरच चीन, ग्रीक आणि इतर सर्वच देशांमध्ये सारखेच होते, पण ते प्रयोग फक्त निरीक्षणावरतीच अवलंबून होते, असेही ते म्हणाले.