Join us

माहिती अधिकारातील माहिती न दिल्याने दंड

By admin | Updated: January 18, 2015 23:04 IST

येथील सुनील मधुकर वैद्य यांनी माहितीच्या अधिकारात भुवनेश्वर येथील बिनशेती जागेच्या मोजणी नकाशाबाबत रोहा तहसीलदारांकडे पत्रावर केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती.

रोहा : येथील सुनील मधुकर वैद्य यांनी माहितीच्या अधिकारात भुवनेश्वर येथील बिनशेती जागेच्या मोजणी नकाशाबाबत रोहा तहसीलदारांकडे पत्रावर केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. तहसीलदारांनी या जागेची मोजणी करण्याबाबत आदेश देऊनही तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून मोजणी करण्यास विलंब झाल्याने अपील दाखल केले होते. या प्रकरणात अपील केलेल्यांना झालेल्या त्रासाबद्दल राज्य माहिती आयुक्त यांनी माहितीच्या अधिकारातील वैद्य यांना १००० रू. नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. वैद्य यांनी भुवनेश्वर येथील जागेच्या मोजणीसाठी २५ मार्च १९९१ रोजी चलनाने पैसे भरले होते. सदर मोजणी अद्यापही करण्यात आलेली नाही. या मोजणीसाठी ९००० रू. इतके शुल्क भरण्याबाबत ७ जानेवारी २०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी महाड यांनी २६ फेब्रुवारी १९९१ रोजी मोजणी करता दिलेल्या परवानगीची मुदत केवळ ३१ जुलै १९९१ पर्यंत होती. चलनाने भरण्यात आलेले पैसे चुकीच्या लेखाशिर्षाखाली भरण्यात आले आहेत. प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपाधीक्षक भूमी अभिलेख रोहा यांना त्यांच्या कार्यालयीन खर्चाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून अपिलार्थी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.