Join us  

जेट एअरवेजला दंड करा, प्रवाशांना नुकसानभरपाई द्या, प्रवासी संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:10 AM

गुरुवारी जेट एअरवेजच्या विमानात घडलेली घटना अत्यंत धोकादायक असून यामध्ये १६६ प्रवाशांचे जीव धोक्यात होते.

मुंबई : गुरुवारी जेट एअरवेजच्या विमानात घडलेली घटना अत्यंत धोकादायक असून यामध्ये १६६ प्रवाशांचे जीव धोक्यात होते. सरकारने या प्रकरणी चौकशी जाहीर केली असली तरी ही चौकशी अत्यंत निष्पक्ष व पारदर्शक प्रकारे व्हावी व या प्रकाराला जबाबदार असलेल्या जेट एअरवेजला दंड आकारण्यात यावा, अशी मागणी एअर पॅसेंजर असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर रेड्डी यांनी केली आहे.डीजीसीएने ही चौकशी लवकर करावी व चौकशी झाल्यावर येणारा अहवाल जाहीर करावा जेणेकरून यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी दबाव राहील. या घटनेमुळे १६६ प्रवाशांचा जीव जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे सरकारने जेट एअरवेजला शिक्षा करावी, अशा परिस्थितीत नेमकी कोणती पावले उचलावीत यासाठी डीजीसीएने हवाई वाहतूक क्षेत्रातील केबिन क्रूसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, प्रवाशांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक हानीबाबत नुकसानभरपाई देण्यात यावी अशा मागण्या रेड्डी यांनी केल्या आहेत.आणीबाणीच्या प्रसंगी केबिन क्रूनी प्रवाशांना माहिती देणे व दिलासा देणे आवश्यक असताना आजच्या घटनेत असे केले नसल्याने रेड्डी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :जेट एअरवेज