अलिबाग : पेणजवळील कांदळे गावात सुरू असलेल्या अॅरो सिटी बांधकाम प्रकल्पाची कंपनी असणाऱ्या अॅरोसिटी मॅनहटन कंपनीचे प्रमुख पदाधिकारी बलवंत खन्ना यांना एक कोटीच्या खंडणीसाठी एसएमएस आला. पैसे दिले नाही तर कंपनीशी संबंधित चौघांना ठार मारू, अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्च रोजी कांदळे येथे अॅरो सिटी मॅनहटन बांधकाम कंपनीच्या प्रकल्पावरील काम उरकून गौरव बलवंत खन्ना संध्याकाळी आपल्या खारघर येथील घरी जात होते. त्यावेळी त्यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून खंडणीसाठी एसएमएस आला. असाच मेसेज गौरव यांचे वडील बलवंत खन्ना यांनाही आला आहे. या खंडणी व धमकी प्रकरणात, रायगड जिल्हा सायबर क्राइम ब्रँचच्या सहयोगाने पेणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करीत आहेत.
पेण अॅरो सिटीच्या पिता-पुत्राला धमकी
By admin | Updated: April 7, 2015 22:36 IST