Join us  

समृद्धीवरील गस्तीच्या गाड्या लालफितीत; कार्यालयातच पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:13 AM

एमएसआरडीसी कार्यालयातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी वाहनांवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्या. त्या रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)  महामार्ग पोलिसांच्या गस्तीसाठी १५ वाहने खरेदी केली आहेत. परंतु, दीड महिन्यापासून या गाड्या एमएसआरडीसी कार्यालयातच उभ्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसी, वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस यांच्यात एक बैठक झाली होती. तीत अपघातांसह दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील पोलिस गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. गस्तीसाठी महामार्ग सुरक्षा पोलिसांकडे वाहने नसल्याने गस्त घालणे अवघड ठरत होते. त्यामुळे १५ गाड्या खरेदी करण्यात आल्या. महामार्ग पोलिसांच्या आवश्यकतेनुसार या वाहनांमध्ये सुविधा देण्यात आल्या आहेत. लवकरच ही  वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामार्ग पोलिसांना सोपवली जाणार आहेत. 

महामार्ग पोलिसांसाठी १५ चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाची परवानगी बाकी होती, ती नुकतीच मिळाली आहे. त्या गाड्यांसाठी चालकाची तरतूद करावी लागली. परवानग्या मिळाल्या असून, महामार्ग पोलिसांना ट्रान्सफरचे पत्र देण्यात आले आहे. या गाड्या येत्या काही दिवसात रस्त्यावर येतील.   - संजय यादव, सहसंचालक, एमएसआरडीसी

टॅग्स :मुंबईसमृद्धी महामार्ग