Join us

पितृपक्षातही काकस्पर्श झाला दुर्लभ

By admin | Updated: September 16, 2014 23:43 IST

सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी o्राद्ध कर्म केली जातात. या कर्मात पिंडाला (घास) काकस्पर्श होणो महत्वाचे मानले जाते.

शहाड : सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी o्राद्ध कर्म केली जातात. या कर्मात पिंडाला (घास) काकस्पर्श होणो महत्वाचे मानले जाते. परंतु, शहरी भागात कावळ्यांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याने आता हा काकस्पर्शही दुर्लभ झाला आहे. त्यासाठी आता कावळ्यांची वाट पहावी लागते.
धर्मशास्त्रत जन्म ते मृत्यू या दरम्यानच्या काळात विविध धार्मिक कार्याना महत्व आहे. यापैकी मृत्यू कर्मात काकस्पर्शाला महत्व आहे. शास्त्रत कावळ्याला ‘वायस’ असे नाव आहे. वायस म्हणजे वायुचे रूप. तेव्हा वायुरुपाने पितरांना दिल्या जाणा:या पिंडीस (घास) कावळ्याने स्पर्श केल्यास पितर प्रसन्न होतात, अशी सर्वाची o्राद्ध आहे. परंतु निसर्गात वेगाने होणारे बदल, बदलती जीवनशैली यामुळे कावळ्यांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे.
शहरी भागातील वाढते औद्योगिकीकरण व पर्यावरणातील प्रदूषण आणि मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गामुळे कावळ्यांची संख्या घटत असल्याचे पक्षीमित्रंचे म्हणणो आहे. वाहनांची अमर्याद संख्या, पक्षांसाठी घातक अशी किटकनाशके आणि रासायनिक औषधींचा शेतात मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर यामुळे सुद्धा कावळयांच्या प्रजाती नष्ट होत आहेत़ तर या सिमेंटच्या जंगलात पक्षांची घरटीही दुरापास्त झाली आहेत. (वार्ताहर)
 
घरातील उंदीर विष देऊन मारण्यात येतात. त्यानंतर ते उघडय़ावर फेकले जातात ते खाल्ल्याने कावळे मरतात.  सध्या वाहनांमध्ये शिसेविरहित पेट्रोलचा वापर केला जातो. ते जळाल्यानंतर त्यातून निर्माण होणारा मिथाईल नायट्रेट किडय़ांसाठी घातक असते हेच किडे कावळ्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे सुद्धा कावळे मरतात.
- संजय गिरासे, पक्षीमित्र कल्याण
 
चिऊ काऊ कोण
आई, आजोबा व आजीकडून चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत मोठय़ा झालेल्या आजच्या पिढीला उद्या आपल्या मुलांना याच गोष्टी सांगण्याची वेळ आली आणि मुलांनी चिऊ काऊ कोण? असा प्रश्न विचारला तर त्यांना काय उत्तर देणार? कारण ज्या वेगाने चिमण्या, कावळे व गिधाडे या पक्षांच्या ्रप्रजाती नष्ट होत आहेत ते पाहता कदाचित पुढच्या पिढीला हे पक्षी पहावयास सुद्धा मिळणार नाही. कदाचित या गोष्टी फक्त पुस्तकात राहतील एवढे मात्र नक्की....