Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिजू पटनायकांनी ओरिसाच्या भविष्याची स्वप्ने पाहिली- नवीन पटनायक; ‘दी टॉल मॅन : बिजू पटनायक’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:38 IST

बिजू पटनायकांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ते झटले. ती स्वप्ने त्यांनी पूर्ण केली, असे प्रतिपादन ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले.

मुंबई : बिजू पटनायकांनी ओरिसाच्या, ओरिसातील लोकांच्या भविष्याची जी स्वप्ने पाहिली, त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ते झटले. ती स्वप्ने त्यांनी पूर्ण केली, असे प्रतिपादन ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शनिवारी सायंकाळी ओरिसाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या ‘दी टॉल मॅन : बिजू पटनायक’ या सचित्र चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या वेळी नवीन पटनायक बोलत होते. नवीन पटनायक आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक, ओरिसा स्कील डेव्हलपमेंट अथोरिटीचे चेअरपर्सन सुब्रतो बागची आणि ‘दी टॉल मॅन : बिजू पटनायक’ या पुस्तकाचे लेखक सुंदर गणेसन उपस्थित होते.नवीन पटनायक म्हणाले की, हे पुस्तक प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायक आहे. या पुस्तकातून ओरिसातील एका महान नेत्याची महानता दाखवली आहे. या पुस्तकातून प्रेरणा घेत देशाला नवी नेतृत्व मिळतील. देशाला अशा तरुणांची आवश्यकता आहे.पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बिजू पटनायकांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, पटनायकांना संगीताची आवड आणि जाण होती. त्यांच्यासारखा संगीतप्रेमी लाभणे विरळच. संगीत, कला आणि कलाकारांचा त्यांना प्रचंड आदर होता. तो त्यांच्या बोलण्यातून, कृतीतून नेहमीच प्रकट झाला. ते कर्तृत्वाने ‘टॉल मॅन’ होते, त्यामुळे त्यांचा सर्वांना आदर वाटतोरमाकांत पांडा म्हणाले, बिजू पटनायक हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरतील. आताच्या आणि येणाºया पिढ्यांना ते पुस्तकरूपाने मार्गदर्शन करतील. मी स्वत: त्यांच्याकडून प्रेरणा घेत इथपर्यंत पोहोचलो आहे.पुस्तकाचे लेखक सुंदर गणेसन म्हणाले, बिजू पटनायक फक्त शारीरिक उंचीने नव्हे, तर कर्तृत्वाने उंच होते, त्यामुळेच या पुस्तकाचे नाव मी ‘दी टॉल मॅन : बिजू पटनायक’ असे ठेवले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान वाचकांना नवी कथा सांगेल. प्रत्येक कथा सर्वांना प्रेरणा देईल.

टॅग्स :मुंबई