Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी केला परिचारिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST

मुंबई : समाजाची अविश्रांत सेवा करणाऱ्या परिचर्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कोरोनामधून बऱ्या झालेल्या लोकांनी केलेला रुग्णालयातील परिचर्या कर्मचाऱ्यांचा सत्कार ...

मुंबई : समाजाची अविश्रांत सेवा करणाऱ्या परिचर्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कोरोनामधून बऱ्या झालेल्या लोकांनी केलेला रुग्णालयातील परिचर्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. रुग्णालयानेही परिचर्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रे प्रदान केली. भाटिया हॉस्पिटलने बुधवारी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भाटिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बौधनकर या कार्यक्रमाबद्दल म्हणाले, “आमच्या परिचर्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतल्यामुळे आणि त्यांचा सत्कार केल्यामुळे आज आम्हालाच खूप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. त्यांनी साथीच्या काळात उत्तम काम केले आहे. ते कर्तव्याप्रति दाखवत असलेल्या समर्पणाचे कौतुक करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. कोविडमधून बऱ्या झालेल्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणे व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे समर्पक ठरेल, असे आम्हाला वाटले.