Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: July 4, 2015 01:42 IST

ऐन पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून महापालिका आवश्यक उपाययोजना करत असली तरीदेखील त्यात प्रशासनाला

मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून महापालिका आवश्यक उपाययोजना करत असली तरीदेखील त्यात प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही. जून महिन्यात मुंबईत तापाचे ४ हजार ४११ रुग्ण आढळले असून, इतर आजारांनीही डोके वर काढल्याने त्या रुग्णांचा आकडाही शंभरच्या घरात पोहोचला होता.आरोग्य विभागाच्या जून महिन्याच्या ‘हेल्थ रिपोर्ट’नुसार, तापाचे ४ हजार ४११ रुग्ण आढळून आले होते. मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ६०९ होता. ४ जणांना लेप्टोची बाधा झाली होती. तर ३८ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. एचवनएनवनचे १९ रुग्ण आढळले होते. तर १ हजार २३ जणांना गॅस्ट्रोची बाधा झाली होती. टायफाइडच्या रुग्णांच्या आकडा १०२ वर पोहोचला होता. तरीही पावसाळ्यादरम्यान बाह्य रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येची शक्यता लक्षात घेता, महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सकाळसोबतच सायंकाळीदेखील सुरू ठेवण्यात येत आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्येदेखील सायंकालीन बाह्य रुग्ण विभागही सुरू करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आठवड्यातील सातही दिवस २४ तास सुरू आहेत.