Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाही पथदिवे सुरूच

By admin | Updated: June 16, 2014 00:53 IST

विजेची समस्या उग्र स्वरुप धारण करीत असताना वसईच्या विविध मुख्य रस्त्यांवर मात्र दिवसाही पथदिवे सुरूच आहेत. या दिवाळीबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

अमर म्हात्रे, नायगावविजेची समस्या उग्र स्वरुप धारण करीत असताना वसईच्या विविध मुख्य रस्त्यांवर मात्र दिवसाही पथदिवे सुरूच आहेत. या दिवाळीबाबत अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.वसईत वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार विविध भागात घडत आहेत. रात्रीही विजेची मागणी वारंवार वाढत असल्याने विजेचा तुटवडा आहे. नागरिक नेहमीच्या भारनियमनाने आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकाराने कातावलेले असताना वसईतील रस्त्यांवरील पथदिवे रात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. प्रत्यक्षात रात्रीसह दिवसाही पथदिवे चालूच ठेवण्याचा विक्रम वसईत दिसत आहे. मालोळ, पापडी, ठामतलावासह भास्कर आळी, गौळवाडा परिसरात दिवसा सर्रास पथदिवे सुरू असतात. आधीच वीज कमी असल्याने महावितरणला मोठ्या वीज संकटाला सामोरे जावे लागत आहे.