Join us

पासपोर्टचा होणार विक्रम

By admin | Updated: November 28, 2014 22:45 IST

ठाणो पासपोर्ट कार्यालयाने या वर्षी विक्रमी कामगिरी करण्याच्या निर्धार केला आहे.

ठाणो : ठाणो पासपोर्ट कार्यालयाने या वर्षी विक्रमी कामगिरी करण्याच्या निर्धार केला आहे. या वर्षात डिसेंबरअखेर दोन लाखांवर पासपोर्टचे वितरण ठाणो पासपोर्ट कार्यालयाद्वारे केले जाणार आहे. 1996 मध्ये ठाणो येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. तेव्हापासून या वर्षीपर्यंतचा हा विक्रम ठरणार असल्याचे सांगितले जाते.
  यापूर्वी 2क्12 मध्ये ठाणो पासपोर्ट कार्यालयाने एक लाख 29 हजार 791 पासपोर्टचे वितरण केले होते. 2क्13 मध्ये हीच संख्या एक लाख 9क् हजार होती. नोव्हेंबर 2क्14 अखेर पासपोर्ट कार्यालयाने एक लाख 83 हजार पासपोर्टचे वितरण केले. पासपोर्ट कार्यालयात दिवसाला 1क्क्क् पासपोर्टसाठी अर्ज स्वीकारले जातात. शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी पासपोर्ट कार्यालयातर्फे विशेष पासपोर्ट मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात किमान एक हजार अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे पासपोर्ट कार्यालयामार्फत सांगण्यात आले. 
   देशभरातून 2क्14 अखेर एक कोटी जनतेला पासपोर्ट वितरणाचा मानस केंद्र सरकारचा असून ठाणो पासपोर्ट कार्यालयातील कर्मचा:यांनीदेखील जास्त काम करून या निर्धाराला हातभार लावण्याचे ठरवले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच या वर्षी डिसेंबरअखेर आम्ही दोन लाखांपेक्षा जास्त पासपोर्ट वितरीत करू शकतो, असा विश्वास ठाणो पासपोर्ट अधिकारी टी.डी. शर्मा यांनी व्यक्त केला. ठाणो पासपोर्ट कार्यालयात अर्ज केल्यावर पूर्वी 4क् ते 45 दिवसांनी अर्ज भरायची तारीख मिळायची. ती आता 32 दिवसांवर आली आहे. पोलीस अहवाल ऑनलाइन देण्याची प्रक्रिया ठाणो पोलिसांनी सुरू केल्यामुळे आता ठाण्यातील नागरिकांना पासपोर्ट लवकर मिळू शकतो. तसेच पुढील महिन्यापासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातीलदेखील पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट ऑनलाइन मिळू लागल्यावर तेथील रहिवाशांनादेखील पासपोर्टचे वितरण लवकर होऊ शकेल, असा विश्वास टी.डी. शर्मा यांनी व्यक्त केला.
 ठाणो पासपोर्ट कार्यालयांतर्गत ठाणो, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव हे जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणोनेदेखील पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट ऑनलाइन पाठवण्याची सुविधा सुरू केल्यास पोलिसांचा व नागरिकांचा वेळ वाचू शकेल आणि त्यांना लवकर पासपोर्ट मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
 
या वर्षी पहिल्यांदाच ठाणो पासपोर्ट कार्यालय त्यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारणार आहे. विरार येथील विवा महाविद्यालयात शनिवार-रविवारी 29-3क् नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना त्यांचे अर्ज देता येतील. विवा महाविद्यालयात पासपोर्ट अधिकारी दोन दिवस थांबणार असून अर्जांची छाननी करून तेथेच ते स्वीकारले जाणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर राहत असलेल्या अर्जदारांना ठाण्यापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. अर्जदारांनी त्यासाठी 666.स्रं22स्र13्रल्ल्िरं.ॅ5.्रल्ल या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.