Join us
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी पासपोर्ट कार्यालय सुरूच

By admin | Updated: October 8, 2014 23:28 IST

येत्या १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे.त्यामुळे यादिवशी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहिर करण्यात आली आहे.

ठाणे : येत्या १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे.त्यामुळे यादिवशी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहिर करण्यात आली आहे. १५ आॅक्टोबरला पासपोर्टचे अर्ज भरण्यासाठी ज्यांना तारीख देण्यात आली आहे. त्यांनी येत्या शनिवार ११ आॅक्टोबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्ट सबमिशनसाठी यावे, असे आवाहन ठाणे पासपोर्ट अधिकारी टी. डी. शर्मा यानी केले आहे. (प्रतिनिधी)