Join us

पाटलांच्या ‘जाऊबाई’ जोरात

By admin | Updated: April 17, 2015 00:32 IST

घणसोली येथील प्रभाग ३४ मध्ये दोन जावा या प्रभागात एकमेकींविरुद्ध उभ्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबईघणसोली येथील प्रभाग ३४ मध्ये दोन जावा या प्रभागात एकमेकींविरुद्ध उभ्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.कोपरखैरणेनंतर माथाडींची मोठी वास्ती घणसोलीत आहे. सिंप्लेक्स परिसराचा मिळून ३४ क्रमांकाचा नवा प्रभाग झाला आहे. विभागाचे विद्यमान नगरसेवक संजय पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यामुळे त्यांच्या जाऊबाई कमलताई पाटील यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळवली आहे. त्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. यापूर्वीही याच विभागात निवडूनही आल्या आहेत. कमलताई व त्यांची मुले प्रशांत व प्रमोद पाटील यांना मानणारा स्वतंत्र गट तेथे आहे. त्याचप्रमाणे संजय पाटील यांनीही पक्षाच्या माध्यमातून तिथे कार्यकर्ता बांधणी केलेली आहे. शेकापच्या बेबी जेजुरकर रिंगणात आहेत. सिडकोनिर्मित माथाडी वसाहतीतील समस्याही गंभीर आहेत. दोघी जावा मतदारांवर कसा प्रभाव टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दोन जावांच्या भांडणाने दुरावलेल्या कार्यकर्त्यांची मतेदेखील पदरात पाडून घेताना त्यांची दमछाक होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिथे दोनही पक्षांना मिळालेल्या मतांचे गणित भिन्न आहे. त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. लोकसंख्या च्या प्रभागाची लोकसंख्या ९,२२५ असून त्यामध्ये अवघे २,५८८ मतदार आहेत.च्विभागातून माथाडी सामाजातील काही व्यक्तींनीदेखील अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.च्मात्र मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षण लागल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यांची मनधरणीदेखील या जावांना करावी लागणार आहे.