Join us
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाला अडचणीत आणणारे विधान केले नाही - जोशी

By admin | Updated: November 23, 2014 01:36 IST

पक्षाला अडचणीत आणणारे किंवा पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत विधान आम्ही कधीही जाणूनबुजून केलेले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे.

मुंबई : पक्षाला अडचणीत आणणारे किंवा पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत विधान आम्ही कधीही जाणूनबुजून केलेले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. प्रवक्ते पदांच्या नियुक्त्यांवरून सर्वत्र बातम्या आल्या. त्यावरून अस्वस्थ झालेल्या मनोहर जोशी यांनी एक निवेदनच प्रसिद्धीस दिले. ज्यात ते म्हणतात, आपण गेली 46 वर्षे पक्षाचा नेता म्हणून निष्ठेने व जबाबदारीने काम करीत आहोत. नवीन पदांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना आहे आणि नवीन तरुणांना संधी देणो हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे त्यातून कोणी वेगळे अर्थ 
काढू नयेत, असेही त्यांनी सुचवले आहे. (प्रतिनिधी)