नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचारामध्येही पक्षपात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या नेत्यांनी बेलापूरवर लक्ष केंद्रित केले होते. ऐरोली मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 15 उमेदवार उभे असले तरी खरी लढत राष्ट्रवादी व शिवसेनेमध्येच होती. निवडणुकीपूर्वी ऐरोली मतदारसंघामध्ये सेनेचे पारडे जड वाटत होते. परंतु उमेदवारीसाठी झालेला घोळ झाला व नंतर प्रचारादरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही ऐरोलीकडे पाठ फिरविली व सर्व लक्ष बेलापूरवर केंद्रित केले. पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांच्या प्रचारासाठी नीलम गो:हे, अभिनेते अमोल कोल्हे, शरद पोंक्षे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजन विचारे यांनी हजेरी लावली होती. परंतु आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ठाणो जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे वगळता इतर नेते ऐरोलीकडे फिरकले नव्हते.
ऐरोलीमध्ये उमेदवार विजय चौगुले यांनी स्थानिक पदाधिका:यांना घेऊन एकाकी लढत दिली. शहरात पक्षामध्ये दोन सत्तास्थाने तयार होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
बेलापूरमधील वाचाळ पदाधिका:याविषयी नाराजी
च्सेनेच्या बेलापूर मतदारसंघामध्ये शहर प्रमुख विजय माने यांनी सर्वाचे लक्ष वेधले होते. उमेदवाराच्या पत्रकांमध्ये व जाहीरनाम्यात प्रकाशक म्हणूनही त्यांचे नाव झळकले. मानेंनी प्रचारात झोकून दिले असले तरी त्यांच्या वाचाळ स्वभावामुळे पक्षातील काही पदाधिकारी नाराज झाले आहेत.
च्जिल्हा प्रमुखांकडे गेले की त्यांचे कौतुक करायचे, दुसरीकडे गेले की दुसरी भूमिका घ्यायची. पक्षातील काही नगरसेवक व पदाधिका:यांविषयी ते समोरून एक व पाठीमागून दुसरे मत व्यक्त करीत असून, त्याची माहिती संबंधितांना मिळू लागली आहे. या दुहेरी भूमिकेमुळे त्यांच्याविषयी नाराजी वाढू लागली आहे.
च्निवडणुकीदरम्यानच शहरप्रमुख हटाव अशी भूमिका काही पदाधिका:यांनी घेतली आहे. काही पदाधिका:यांनी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले असले तरी नाराज पदाधिका:यांनी मात्र मानेंच्या वाचाळपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार आहे.