Join us  

काेराेना रुग्णांमध्ये अंशत: वाढ; सर्वांसाठी लाेकल सुरू झाल्यानंतरची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:15 AM

चिंतेचं कारण नाही, पालिकेचं स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत नियंत्रणात आल्याने लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. यामुळे गेल्या १० दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढ तुलनेने कमी असून चिंतेचे कारण नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तरीही खबरदारी म्हणून यापुढेही रुग्ण संख्येवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.शुक्रवारी दिवसभरात ५९९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.१३ टक्के एवढा आहे. दिवसभरात ६१२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ९४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११,४०७ एवढा आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२५ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.महापालिकेच्या अहवालानुसार सध्या पाच हजार २९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ३४४ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या चार कोरोना रुग्णांपैकी तीन रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी दोन रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या चारपैकी दोन रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. तर एक रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील आणि एक रुग्ण ४० वर्षांखालील होता. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा तीन लाख १२ हजार ९०२ एवढा आहे. तर आतापर्यंत २९ लाख पाच हजार ३४४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.रुग्ण संख्येतील वाढ (फेब्रुवारी)तारीख    रुग्ण संख्या१    ३२८२    ३३४३    ५०३४    ४६३५    ४१५६    ४९४तारीख    रुग्ण संख्या७    ४४८८    ३९१९    ३७५१०    ५५८११    ५१०१२    ५९९मुंबई महानगर प्रदेशातील वाढतारीख    रुग्ण संख्या१    ५९२५    ८३०१०    १०७५१२    १०१६

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या