Join us
Daily Top 2Weekly Top 5

एलजीबीटी मुख्य प्रवाहाचाच भाग

By admin | Updated: June 16, 2015 01:15 IST

भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही आणि अशा वेळी समलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे़

मुंबई : भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही आणि अशा वेळी समलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे़ या जाहिरातीत दोन मुलींच्या अंतर्गत संबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यात दोन मुली एकमेकांवर प्रेम व्यक्त करीत आहेत. या जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असले तरी एलजीबीटी समुदायासाठी आणि समुदायातील तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी या जाहिरातीचे स्वागत केले असून, एलजीबीटी समुदाय मुख्य प्रवाहाचाच भाग असल्याचे मत मांडले आहे.याविषयी एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या ‘हमसफर’च्या डॉ. अल्पना डांगे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे एलजीबीटी समुदायाच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा सुरू आहे. परंतु हा विचारांचा लढा असल्याने अजून बरीच वर्षे विचारप्रबोधन होण्यास जातील. ज्या प्रकारे स्त्री-पुरुष वर्गाचा विचार करून जाहिराती बनविल्या जातात, त्याप्रमाणे एलजीबीटी समुदायाचा विचारही सर्व बाबतीत केला पाहिजे. या जाहिरातीमुळे अशा प्रकारचा विचार समाजात रुजण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्राने जाहिराती तयार करताना ग्राहक वर्गाचा विचार होण्याची शक्यता आहे.-या जाहिरातील दोन मुलींना संपूर्ण जीवन एकमेकांसोबत जगायचे आहे. ही जाहिरात आता व्हायरल झाली आहे़ या जाहिरातीला आतापर्यंत लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. -या जाहिरातीला ‘द व्हिजिट’ नाव देण्यात आले आहे़ भारतातील ही पहिली समलैंगिक जाहिरात आहे़ ही इंटरनेटवर व्हायरल झाली आहे़ मागील १० दिवसांत अडीच लाख लोकांनी ही पाहिली आहे. या मुली आपल्या पालकांना भेटणार आहेत, त्यासाठी त्या तयार होत आहेत.