Join us  

चर्नी रोड स्थानकाजवळील पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळला; एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 9:03 PM

चर्नी रोड स्थानकाजवळील पालिकेच्या हद्दीतील पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. महर्षी कर्वे रोडवर महापालिकेच्या हद्दीतील हा फुटओव्हर ब्रिज आहे.

मुंबई : चर्नी रोड रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाय-यांचा काही भाग शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोसळून एक जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. डोंगरसिंग रामचंद्र राव असे जखमी व्यक्तीचे नाव असून सैफी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ निष्पापांचा बळी जाण्याच्या दुर्घटनेला काही दिवस उलटत नाहीत, तोच चर्नी रोड येथील पुलाच्या पायºयांचा भाग कोसळल्याने एक जण जखमी झाला. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, चर्नी रोड येथील पुलासाठी काही दिवसांपूर्वीच आंदोलन करण्यात आले होते. त्यातच आता ही दुर्घटना घडल्याने प्रशासनाला जाग येणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या धोकादायक पुलाचे पुनर्बांधणीसाठी तोडकामही सुरू होते. कामसुरू असतानाच पाय-यांचा भाग कोसळला. ‘लोकमत’ ने हा पूल मोडकळीस आल्याचे आणि पायºया तुटल्याचे वृत्त नुकतेच दिले होते. ठाकूरद्वार परिसरातून येणारे नागरिक याच पुलाचा उपयोग करत आहेत.चर्नी रोड येथील दुर्घटनास्थळी शनिवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गोळा झाले. गोळा झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचला. शिवाय प्रशासनाच्या विरोधात घोषणाही दिल्या. दुर्घटनेला महापालिका आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा विपरीत परिणाम म्हणून ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली.दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शिवाय येथील डेब्रिज उचलण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले.चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेकडील पुलाच्या पाय-या तुटल्यामुळे आता ठाकूरद्वार आणि गिरगाव परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. कारण ज्यांना तिकीट काढून फलाटावर जायचे असेल त्यांना आता त्यांना सैफी रुग्णालयाजवळ असणा-या पुलाचा वापर करावा लागेल. तेथे एकच तिकीट खिडकी आहे. तसेच या पुलावरून रोज सकाळी चौपाटीला वॉकला जाणारे नागरिक ये-जा करतात. पूर्ण पूल बंद केल्यास आता नागरिकांना वळसा घालून जावे लागणार आहे. 

तेव्हा पुलावर ५ माणसे...चर्नी रोडचा पूल हा साधारणत: शनिवारी रात्री ८.२० च्या दरम्यान पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. या ठिकाणी पुलाच्या पाय-या चढल्यावर थोडा सरळ भाग आणि मग पाय-या होत्या. हा सरळ भाग आणि वरच्या ४ ते ५ पायºया पडल्या. या ठिकाणी झाडे असल्यामुळे अंधार असतो. पूल पडला तेव्हा पुलावर ४ ते ५ माणसे होती. पण उंची कमी असल्यामुळे किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी मोहन सोहनी यांनी सांगितले.दुर्घटनाग्रस्त पूल महापालिकेचा की रेल्वेचा हा मुद्दा महत्त्वाचा नाही. तर दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नाही हे सुदैव आहे. पुलाचे काम सुरू झाले आहे. दोन्ही प्रशासनाच्या समन्वयाने पुलाचे काम केले जाईल.- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

 

चर्नी रोड स्टेशनजवळील पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळायला पालिका जबाबदारचर्नी रोड स्टेशनजवळील पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळायला मुंबई महापालिता जबाबदार आहे. हा पूर पालिकेच्या हद्दीतील असल्याचं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलं आहे.पुलाचा प्रवास४ जानेवारी १०२४ - स्थानिक नगरसेवकाकडून प्रमुख अभियंता (पूल) यास पत्र१ जुलै २०१४ - स्थानिक नगरसेवकाकडून तत्कालीन पालिका आयुक्तास पत्र२० जुलै २०१५- पुन्हा एकदा पूल उभारण्याची मागणी१२ आॅक्टोबर २०१५- कामाचा आराखडा मंजूर निविदा बनविण्याचे काम अंतिम टप्प्या

टॅग्स :मुंबई