मुंबई : उपपोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी केलेला अर्ज मॉडेलने मागे घेतला आह़े पारसकर यांनी 2क्13मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या मॉडेलने पोलिसांत केली आह़े
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी पारसकर यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता़ त्यावरील सुनावणीत अॅड़ रिझवान र्मचट यांनी पारसकर यांच्यावतीने युक्तिवाद केला़ ही तक्रार केवळ पारसकर यांना अडकवण्यासाठी केली असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी अॅड़ र्मचट यांनी केली होती़
ती ग्राह्य धरीत न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात पारसकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला़ तो रद्द करावा, यासाठी या मॉडेलने
स्वतंत्र अर्ज न्यायालयात केला होता़ हा अर्ज मॉडेलने आता मागे घेतला़ (प्रतिनिधी)