Join us

रहिवाशांच्या आक्रमकतेमुळे पार्किग बंद

By admin | Updated: December 11, 2014 01:05 IST

पार्किगने मुंबईतील रस्त्यांचा जीव कोंडला जात असतानाच एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांच्या न्यायालयीन लढाईमुळे पेडर रोडच्या एका रस्त्यावरील पार्किग बंद होणार आह़े

अमर मोहिते ल्ल मुंबई
कोठेही होत असलेल्या पार्किगने मुंबईतील रस्त्यांचा जीव कोंडला जात असतानाच एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांच्या न्यायालयीन लढाईमुळे पेडर रोडच्या एका रस्त्यावरील पार्किग बंद होणार आह़े तसे आदेशच उच्च न्यायालयाने बुधवारी दिल़े महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची गाडी आपल्यार्पयत सहज व जलदगतीने पोहोचावी यासाठी या रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती़
उच्चभ्रू पेडर रोडवरील माऊंट युनिक गृहनिर्माण सोसायटीने यासाठी याचिका केली होती़ या सोसायटीच्या जवळ डॉ़ गोपाळराव देशमुख मार्ग आह़े या मार्गावर वाहने पार्क केली जातात़ याची नोंद अग्निशमन दलानेही केली़ याने आपत्कालीन परिस्थितीत सोसायटीजवळ अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकणार नाही, असेही सोसायटीला सांगण्यात आल़े
न्या़ रणजित मोरे व न्या़ अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारल़े पार्किगमुळे अग्निशमन दलाची गाडी आपत्कालीन परिस्थितीत जाऊ शकत नाही आणि ही पार्किग हटवण्यासाठी एखाद्या सोसायटीला न्यायालयात यावे लागणो हे गैर आह़े तेव्हा शासनाने तत्काळ ही पार्किग हटवण्याची हमी द्यावी, असे न्यायालयाने सांगितल़े मात्र ही पार्किग हटवण्यासाठी न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी विनंती सरकारी वकील याज्ञिक यांनी केली़ होती.
 
या सोसायटीने या मार्गावरील पार्किग हटवण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाकडे पाठपुरावा केला़ मात्र पार्किग काही हटली नाही़ अखेर सोसायटीने यासाठी न्यायालयाचे दार ठोठावल़े