Join us
Daily Top 2Weekly Top 5

पराग अळवणी यांना मातृशोक

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

फोटो मेलवर पाठवला आहे

फोटो मेलवर पाठवला आहे
.................................
पराग अळवणी यांना मातृशोक
मुंबई: विलेपार्ले येथील भाजपा आमदार ॲड. पराग अळवणी यांच्या मातोश्री शीला मधुसुदन अळवणी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने शुक्रवारी निधन झाले. मृत्यूपश्चात त्यांनी नेत्र आणि त्वचादान केले. दुपारी त्यांच्यावर पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र पराग, तीन मुली, सून, जावई आणि आठ नातवंडे असा मोठा परिवार आहे. शीला अळवणी यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्या राष्ट्र सेविका समितीमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते.