Join us
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा पनवेल दौरा

By admin | Updated: April 6, 2015 22:41 IST

: राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाच्या प्रधान सचिव मिता लोचन यांनी सोमवारी स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी पनवेलचा दौरा केला.

पनवेल : राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाच्या प्रधान सचिव मिता लोचन यांनी सोमवारी स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी पनवेलचा दौरा केला. यावेळी त्यांनी पनवेल नगरपरिषदेच्या कामकाजासह शहरामधील समस्याही जाणून घेतल्या. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भेट देवून त्याठिकाणच्या रहिवाशांशी, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांबाबत लोचन यांनी चर्चा केली. पनवेलमधील या भेटीदरम्यान लोचन यांनी बँक आॅफ इंडियाच्या पनवेल शाखेला भेट दिली. बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने हातभार लावण्यासाठी नगरपरिषदेला सहाय्य करावे, त्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या पुरविण्याची विनंती त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. शहरात होऊ घातलेले प्रकल्प, भेडसावणाऱ्या समस्या, नगरपरिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचीही लोचन यांनी माहिती घेतली. दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, स्थायी समिती सभापती अनिल भगत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी आदी यावेळी उपस्थित होते.