कळंबोली : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेत सापडलेल्या मुलांपैकी ८५ टक्के मुले हे परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रीय मुलांची संख्या अतिशय कमी असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड ही राज्ये काही प्रमाणात मागासलेली असल्याने या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत.पनवेल परिसरात महामुंबई विकसित होत असल्याने येथे परप्रांतीयांचा लोंढा येत आहे. येथे आलेल्या मजुरांची मातृभाषा वेगवेगळी असल्याने मराठीचा त्यांना गंध नाही. ही समस्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. आई-वडील मजुरीला गेल्यावर घराची देखभाल, लहान भावंडांचा सांभाळ याकरिता विशेषत: मुलींची शाळा सुटली. यासारखी कारणे या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आली.
पनवेलमध्ये परप्रांतीयच शाळाबाह्य
By admin | Updated: July 6, 2015 01:30 IST