Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ल्यात माथाडी कामगारांमध्ये दहशत

By admin | Updated: June 17, 2016 02:25 IST

कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील दोन वेगवेगळ््या शोरूममध्ये काम करणाऱ्या आठ माथाडी कामगारांना आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते काम करू देत नसल्याचा आरोप श्री स्वामी

मुंबई : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील दोन वेगवेगळ््या शोरूममध्ये काम करणाऱ्या आठ माथाडी कामगारांना आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते काम करू देत नसल्याचा आरोप श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार युनियनने केला आहे. मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली आहे.गेल्या साडेतीन वर्षांपासून चार माथाडी कामगार येथील क्रोमा शोरूममध्ये, तर चार कामगार १ मे २०१६ पासून येथील दुसऱ्या खासगी शोरूममध्ये काम करत होते. मात्र कदम यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कामगारांना मारहाण करत कामावर येण्यास मज्जाव केल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष नवनाथ पवार यांनी केला आहे. यासंबंधी धातू व कागद बाजार आणि दुकाने माथाडी कामगार मंडळाकडे आणि घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, मात्र कदम यांच्या दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदार राम कदम यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर पीडित कामगारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दुसऱ्या कामगारांना समज दिली. शिवाय कामगार मंडळाच्या आयुक्तांकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याचे चिराग नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)