Join us

पालघरला तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 31, 2015 22:37 IST

पालघर जिल्ह्यातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी ओढवली असून वाडा, जव्हार, मोखाडा, इ. सह आदिवासी बहुल

पालघर : पालघर जिल्ह्यातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी ओढवली असून वाडा, जव्हार, मोखाडा, इ. सह आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रामणात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजनेसाठी पालघर जिल्हाािधकारी कार्यालयाने ठोस पावले उचलली आहेत.पालघर तालुक्यात सध्यातरी पाण्याची टंचाई जाणवत नसून पाण्याचा बऱ्यापैकीसाठा नदी व बंधाऱ्यामध्ये उपलब्ध आहे. परंतु जिल्ह््यातील इतरही तालुक्यात पाणीटंचाईची भीषणता पाहता टँकर व बैलगाड्याद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु केलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ३ ते ४ दिवसात सर्व टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)