Join us

पालघर भ्रष्टाचार : श्रमजीवीचा एल्गार

By admin | Updated: December 8, 2014 23:35 IST

डहाणू तालुक्यातील गाव-पाडय़ात रोहयो योजनेंतर्गत विविध कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात o्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी रणशिंग फुंकले आहे

पालघर : पालघर जिल्हय़ातील जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील गाव-पाडय़ात रोहयो योजनेंतर्गत विविध कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात o्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी रणशिंग फुंकले आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी विरोधात या संपुर्ण प्रकरणाची तड लागेर्पयत आपण  लढणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
पालघर जिल्हय़ातील जव्हार तालुक्यातील चांभारशेत, खरोंडा इ. विक्रमगड तालुक्यातील कासा, बुदूं्रक तर डहाणू तालुक्यातील वनई, वाघोडी इ. भागात रोहयो अंतर्गत सन 2क्12-13, 13-14 व सन 2क्14-15 या वर्षात मोठय़ा प्रमाणात विहिरी खोदणो, नर्सरी उभारणो, चर खोदणो इ. कामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु या मंजूर निधीचा खर्च करताना अधिकारी व काही कर्मचा:यांना यामध्ये भ्रष्टाचार करता यावा यासाठी बोगस मस्टर्स तयार करून पैशाचे वाटप करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.
रोहयो योजनेंतर्गत कामामुळे गावात रोजगार निर्माण व्हावा, गावाचा विकास व्हावा असे उद्दीष्ट असताना यातील हेतूची पायमल्ली होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणो आहे. लोकमतने 1 डिसेंबर पासून जव्हार, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील वनविभाग, कृषी व पंचायत समिती अंतर्गत रोहयोच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची मालीका सुरू केली असून भ्रष्टाचाराची दखल आदिवासी मंत्री विष्णु सावरा, राज्यस्तरीय सामाजिक अॅन्टेक्शनचे राहुल तिवरेकर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर इ. नी गंभीरपणो दखल घेतली आहे. या भ्रष्टाचाराबाहेर काढण्यासाठी कामाचे सोशल ऑडीट करण्यात येणार असून या भ्रष्टाचारात सहभागी अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांचे खरे चेहरे बाहेर येणार आहेत. आता या भ्रष्टाचाराबाहेर काढण्यासाठी आदिवासी मंत्री, जिल्हाधिकारी, कष्टकरी संघटनेसह o्रमजीवी संघटनाही आक्रमक झाली असून आदिवासी समाजाच्या विकासाच्या आड येणा:यांना o्रमजीवी संघटने स्टाईलने धडा शिकविण्यात येणार आहे. येत्या आठवडा भरापासून तिन्ही तालुक्यातील भ्रष्टाचारामुळे बाधीत झालेल्या  लाभाथ्र्याच्या भेटी घेऊन या प्रकरणाची तड लागेर्पयत लढणार असल्याचे विवेक पंडीत यांनी लोकमतला सांगितले.