Join us

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र-वली उर रहमान

By admin | Updated: November 24, 2015 02:39 IST

पाकिस्तानची गुप्तचर संघटना (आयएसआय) ही बांगलादेशची क्रमांक एकची शत्रू असून तिच्यावर पाकिस्तानचे नियंत्रण नाही, असे बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार वली-उर-रहमान यांनी म्हटले.

डिप्पी वांकाणी,  मुंबईपाकिस्तानची गुप्तचर संघटना (आयएसआय) ही बांगलादेशची क्रमांक एकची शत्रू असून तिच्यावर पाकिस्तानचे नियंत्रण नाही, असे बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार वली-उर-रहमान यांनी म्हटले. दहशतवादाचे केंद्रच पाकिस्तान असून दहशतवादी हाफीज सईद इस्लामाबादेत खुलेपणे फिरताना बघून मला तीव्र वेदना होतात, असेही ते म्हणाले.इंडिया फाऊंडेशन, मुंबईतील अमेरिकन दूतावास आणि अटलांटिक कौन्सीलने सोमवारी येथे आयोजित केलेल्या महानगरांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना वली-उर-रहमान म्हणाले की, भारताविरुद्ध काम करणाऱ्या ‘उल्फा’च्या नेत्याला आम्ही त्यांच्या सुपूर्द केले आहे, असे सांगून ते म्हणाले, हाफीज सईद इस्लामाबादेत उजळ माथ्याने फिरत असेल तर आम्ही दहशतवादाचा बिमोड कसा करू शकू?’’ जगातील महानगरांच्या सुरक्षेबद्दल चर्चा करण्यासाठी आठ महत्वाच्या शहरांतील धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होते. सीमा सुरक्षा दलाचे माजी महासंचालक परिषदेतील धोरण, सुरक्षा आणि शहरांचा आधार या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, २६/११ च्या हल्ल्यानंतर भारताने काही निश्चित पावले उचलली तरीही आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे. तीन दशलक्ष राज्य पोलीस आणि एक दशलक्ष केंद्रीय दले आहेत. पोलीस ठाण्यात आणखी पोलिसांची गरज आहे. प्रशिक्षणाच्या आमच्याकडे आणखी सोयी नाहीत. दरवर्षी केवळ ६५ हजार कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण देऊ शकतो. प्रशिक्षणाचे काम आऊटसोर्सिंग करून घेण्याची गरज आहे. आमच्याकडेही दहशतवादविरोधी केंद्राची गरज आहे आणि माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी राज्यांनी संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा तयार करण्याची गरज आहे.